
नशिबापुढे कोणाचेच
काही चालत नाही
नशीब बलवत्तर असेल
तर आयुष्य सुखी राही
नशिबाने साथ दिली
तर नोकरी चांगली मिळते
आणि लग्नासाठी छोकरी ही
नाहीतर दोन्हीही रखडते
केव्हा केव्हा नशीब
कष्टाने मिळवावे लागते
कष्ट केल्या नंतरच
नशीब साथ देते
नशीब सहज मिळत नसते
ते मेहनतीनच मिळते
कर्म चांगले असेल तर
नशीबही चांगलेच असते
रेखा डायस
गोवा















