prabodhini news logo
Home कविता नम्रता आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा…

नम्रता आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा…

0
233

जन्माचा हा सोनेरी दिवस
करू साजरा वाढदिवस
सुंदर दिवसांसाठी सुंदर शुभेच्छा !
जगणे व्हावे सुंदर हिच सदिच्छा!

जीवन वाट ही खास खास
कधी उत्तर कधी दक्षिण
पुर्व पश्चिम ही जीवनात
वेच वेच तू आनंदी क्षण

सुंदर मनात विचार सुंदर
जन्माचे मग होते अत्तर
आयुष्य हे भिजवून घ्यावे
जीवनगाणे गात जगावे

शोभून दिसते सखी भारी
घेऊन येईल सोख्य दारी
पुन्हा एकदा खुप शुभेच्छा
सुख ऐश्वर्य लाभो हिच सदिच्छा!!!

गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here