
कोपरगाव शहर प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे 7744022677
कोपरगाव तालुक्यातील चास नळी येथे फार्मर्स डेन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घडविले पंढरपूर वारीचे दर्शन. दिनांक 5-7-2025 रोजी सकाळी प्रथम गोदावरी निर्माण डेव्हलपर्स तसेच गोदावरी विकास प्रतिष्ठान माननीय संस्थापक पंडितराव यादवराव चांदगुडे यांच्या हस्ते नारळ फोडून दिंडीचे प्रस्थान करण्यात आले .मुलांनी विविध प्रकारचे वेशभूषा करून पारंपरिक संप्रदायाचे दर्शन घडवून पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. सालाबाद प्रमाणे यावर्षीही फार्मर्स डेन पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाची प्रदर्शनी झाली. प्रथम गावातून स्कूलच्या विद्यार्थ्यांची दिंडी स्वरूपात हातात पताका. टाळ मृदुंग. व झेंडे घेऊन मिरवणूक काढण्यात आली गावोगावातून विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. सदर दिंडी मिरवणूक चास नळी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रस्थान होऊन तेथे युवराज पंडितराव चांदगुडे व माधुरी युवराज चांदगुडे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची आरती पूजाविधी करण्यात आली व तसेच विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम भजन टाळ मृदंगाच्या राम कृष्ण हरी अशा जयघोषात सादर केले. फार्मर्स डेन पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल अर्चना बोरावके यादेखील येथे उपस्थित होत्या तसेच महादेव मंदिर व श्रीराम सृष्टी येथे देखील मुलांनी भेट दिली. या कार्यक्रमाचा आनंद घेऊन वर्षभर जीवनात उत्साहाने काम करतात ही महाराष्ट्राची आदर्श परंपरा असून मानवतेला साथ घालणारी एक आगळीवेगळी तिची वैशिष्ट्य आहे मागील एक महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय झाला असून यावर्षी राज्यात सर्व नागरिकांना सुख-समृद्धी लाभू दे बंधुभाव नांदू दे आणि भरपूर पाऊस पडून राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी केली. महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे हा मानवतेचा धर्म जपण्याचे विचार साधुसंत व महात्म्यांनी दिले आहेत असे या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायातून दाखवून दिले.या दिंडी कार्यक्रमासाठी आहिरे मिलिंद ,भारती बिपिन,काळुंगे विजय ,भोसले रवींद्र ,निर्भवणे गणेश ,वाणी मनीषा ,वाणी वैशाली, जगझाप गायत्री, बडवर विशाखा .तिरशे गीता. बोडखे माधुरी, माळी योगिता ,साबळे सुजाता ,माळी भारती. व इतर शिक्षक वृंदांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.















