
ऋणात मी त्यांच्या
आयुष्यात जन्मभराचा
या जीवनाला घडविले
त्या आघाध गुरु महिमाचा…..
कर्तव्याची जाणीव
थोर ज्ञानदीप पेटविला
तुमच्याच मुळे प्रकाश
अंधार दूर केला जगण्यातला…
परंपरा गुरु शिष्याची
सुदृढ भारत वर्षाला
नतमस्तक तो माथा
होतो तुमच्या ज्ञानाला…
उच्च ध्येय उच्च शिक्षण
प्रज्ञा शील करुणा
माणसातील माणुसकीला
तुम्हीच मर्म जाणा….
गुरु विना मार्ग नाही
ज्ञानाची कांडी त्यांच्याजवळ
गुरुची गुरुदक्षिणा
फक्त दुर्बुद्धीला जाळ
फक्त दुर्बुद्धीला जाळ….
मनोज रामचंद्र गायकवाड
शहापूर जिल्हा ठाणे














