
प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी, चंद्रपूर – दि.14: नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आल्यामुळे 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजतापासून 17 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील आय-सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील. तरी संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी कळविले आहे.















