prabodhini news logo
Home कोरची कोरची आश्रम शाळेत सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न

कोरची आश्रम शाळेत सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न

0
282

कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथील उच्च माध्यमिक शिक्षक पी.के मेश्राम हे वयोमानानुसार ३१ आगस्टला रोज रविवारला सेवानिवृत्त होत असल्याने आश्रम शाळेच्या वतीने आदिवासी विकास विभागात अतिदुर्गम भागातील शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती करीता प्रदिर्घ सेवादिल्याबद्दल सेवानिवृत्तीपर कृतज्ञता गौरव सोहळा दिनांक २९ आगस्टला येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक सर हे होते, सहध्यक्ष म्हणून प्रमोद शंभरकर होते सत्कार मुर्ती म्हणून श्री. पी.के.मेश्राम व त्यांचे सहकुटूंबीयक्ष तथा इतर मान्यवर उपस्थित होते.
सत्कार मूर्ती पी.के.मेश्राम व त्यांच्या सपत्नीक यांचा शाळेच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी गुरुराज मेंढे, हरीश कामडी, प्रीती खंडाते,गीता राऊत, डाकराम ठाकरे, प्रमोद शंभरकर,अरुण कायंदे सर यांनी आपल्या मनोगतातून केलेल्या सेवेचा व त्यांच्या कार्याचा गुणगौरव करीत असताना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरचा काळ सुखी- समृद्धी ,आनंदाने जावो व त्यांना चांगले आरोग्य लाभो यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,आश्रम शाळेतील नौकरी करताना अनेक कठीण प्रसंगाना तोंड द्यावे लागते. आदिवासी भागात काम करताना आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या मुलांपेक्षा जपावे लागते. आश्रम शाळेतील चौवीस वर्षात कधी शिक्षक तर कधी मुख्याध्यापक आणि अधिक्षक यांची जबाबदारी पारपाडताना जीवाची घालमेल करावी लागते.याच काळात अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देवून त्यांचे जीवनमान उंचविण्याची संधी मिळाली. तेव्हा येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर समाज सेवेसाठी आपल्या परीने योगदान करण्याचे ठरविले आहे. तसेच यशस्वी होण्यासाठी सहकाऱ्यांचे विचार त्यांचे सहकार्य मिळणे अतिशय महत्त्वाचे असते. माणसाने आपल्या जीवनात सतत सत्य आचरणात आणून चांगले कर्म करावे असे त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले.
श्री.पी.के.मेश्राम हे अतिशय मनमिळावू व शांत स्वभावाचे व्यक्ती असून आपल्या शालेय कामात अत्यंत तरबेज व वेळेवर निर्णयक्षमता आणि हजारजबाबीपणा असे व्यक्तिमत्व असून साधी राहणे व उच्च विचार असलेले. अशा व्यक्तींची विद्यालयाच्या प्रगतीसाठी आवश्यकता आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन अरुण कायंदे यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रकला पटले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व कर्मचारी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here