prabodhini news logo
Home चंद्रपूर राष्ट्रसंत साहित्यावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा संपन्न

राष्ट्रसंत साहित्यावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा संपन्न

0
99

विद्यामंदिर हायस्कुल व जिल्हा परिषद शाळेचा सहभाग

प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – चंद्रपूर : श्री गुरुदेव सेवा आश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाद्वारे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या साहित्यावर आधारित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज्यांच्या साहित्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रसंतांच्या साहित्यातील ग्रामनाथ व ग्रामगितेतील सणोत्सव या विषयांपैकी एक विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.सदर निबंध स्पर्धा संपूर्ण चंद्रपूर जिल्हाभरात वर्ग ७ ते १२ च्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आली होती.यात ऊर्जानगर वसाहतीतील विद्यामंदिर हायस्कुलच्या वर्ग ७ ते १० च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरगांव (चांदसुर्ला) च्या वर्ग ७ च्या विद्यार्थ्यांना सहभाग घेतला होता. ही निबंध स्पर्धा समन्वय समितीच्या प्रमुख मा.बंडोपंत बोढेकर,एड.राजेंद्र जेनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कुल ऊर्जानगरचे मुख्याध्यापक मा.दिलीप पवार सर, गिरी सर व जिल्हा परिषद शाळा खैरगांवचे मुख्याद्यापक भारत खेडकर सर याच्या सहकार्याने निबंध स्पर्धा समितीचे समन्वयक देवराव कोंडेकर तसेच शाळेचे शिक्षक परचाके,सुर्तेकर, कुलसंगे,मेश्राम मॅडम,सुरेश शेंडे,गीता पिदूरकर यांच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात आली. सहभागी स्पर्धकांना आयोजकाकडून जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच चार प्रोत्साहन पर बक्षीस निवड करून व उत्तम सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here