prabodhini news logo
Home गडचिरोली समर्पक विचाराचे मंथन म्हणजे साहित्य संमेलन

समर्पक विचाराचे मंथन म्हणजे साहित्य संमेलन

0
71

डॉ. धनराज खानोरकर : आदिवासी साहित्य संमेलन

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – आष्टी “साहित्य हा समाजाचा आरसा असून त्यातून जीवनदर्शन प्रतित होत असते.मानवाचे जीवन चांगल्या विचाराने प्रेरित होण्यासाठी अशा सोहळ्यात चर्चा विमर्श होऊन नविन विचारांना चालना मिळते, म्हणून समर्पक विचाराचे मंथन म्हणजे साहित्य संमेलन असते.” असे मार्मिक भाष्य प्रसिद्ध कवी व लेखक डॉ. धनराज खानोरकरांनी केले.ते मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे पहिले गडचिरोली जिल्हा आदिवासी साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
विचारपीठावर संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत डॉ विनायक तुमराम होते तर प्रमुख उपस्थितीत वनवैभव शिक्षक मंडळाचे सचिव बबलूभैया हकीम, सामाजिक कार्यकर्ते शाहिनभाभी हकीम, प्राचार्य डॉ. रंजित मंडल, प्राचार्य डॉ संजय फुलझले, प्रा. चौथाले, संमेलन संयोजक डॉ. राजकुमार मुसणे उपस्थित होते.
याप्रसंगी बबलूभैया हकिम यांनी आयोजनाबद्दलची भूमिका मांडली.अध्यक्षीय मनोगतात, डॉ. तुमरामांनी,” आपल्या लोकांनी राजकारणात सक्रिय होऊन समाजकारण करावे.आदिवासी समाजाचा वाटा त्यांना मिळावा व त्यांचे उत्थान व्हावा “असा आशावाद व्यक्त केला.
प्रास्ताविक संयोजक डॉ. राजकुमार मुसणें यांनी केले.संचालन डॉ गणेश खुणे तर आभार डॉ. शास्त्रकार यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य श्रोते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here