prabodhini news logo
Home गडचिरोली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा येथील विद्यार्थिनीचा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा येथील विद्यार्थिनीचा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

0
114

रामगोपाल अट्टेला तालुका विशेष प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज सिरोंचा – दिनांक 6 जानेवारी 2026 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे प्रादेशिक विद्या. प्राधिकरण नागपूर व शिक्षण विभाग जि. प.गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 53 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन डॉक्टर होमी जहांगीर भाभा विज्ञान नगरी नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा वांगेपल्ली तालुका अहेरी या ठिकाणी आयोजित केले. दिनांक 3 ते 6 जानेवारी 2026 या कालावधीत पार पाडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून विज्ञान प्रकल्प, मॉडेल,प्रतिकृती ठेवण्यात आले. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे विद्यार्थिनी कुमारी. पवित्र समय्या सप्पीडी प्राथमिक दिव्यांग गटातून विद्यार्थी वैज्ञानिक प्रतिकृती साहित्य निर्मितीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केले. विज्ञान विषय शिक्षिका एस. एम. रॉय यांनी मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण समारंभात विद्यार्थिनीला स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दीपक दादा आत्राम (माजी आमदार )यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी अंबरीशराव महाराज (माजी आमदार) तसेच वासुदेव भुसे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाबासाहेब पवार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नितीन बच्छाव शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या विशेष उपस्थितीत बक्षीस देण्यात आले . त्याचबरोबर या समारंभात नीलकंठम दोंतुलवार गटशिक्षणाधिकारी पं स सिरोंचा के.के चव्हाण (शिक्षण विस्तार अधिकारी) तसेच मुख्याध्यापिका मनीषा साखरे उपस्थित होत्या. या यशामुळे तालुक्यातून सर्व स्तरापासून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here