
सरांडी/ बूज येथे समता सैनिक दलाचा ६ वा वर्धापन दिन साजरा
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – दिनांक ६ जानेवारी २०२६ ला समता सैनिक दलाचा ६ वा वर्धापन दिन सरांडी /बूज येथे प्रचंड उत्साह, शिस्तबद्ध संचलन, घोषणांच्या गजरात साजरा करण्यात आला. यावेळी समता सैनिक दल हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं जिवंत आणि लढाऊ प्रतीक आहे. समाजातील अन्याय, विषमता आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणारी ही चळवळ आहे असे प्रतिपादन रोशन फुले यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदना घेण्यात आली. त्यानंतर समता सैनिक दलाचे पथसंंचालन सादर करण्यात आले. त्यांनंतर जय भीम चे जनक बाबू हरिदास एल. एन. यांची जयंती साजरी करण्यात आली. व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक रोशन फुले पुढे म्हणाले, जेव्हा अन्याय डोकं वर काढतो, जेव्हा संविधान धोक्यात येतं, जेव्हा दलित, वंचित, शोषितांवर अत्याचार होतो,तेव्हा समता सैनिक दल पहिल्या रांगेत उभं राहतं. आपल्या हातात बंदूक नसली तरी छातीत विचारांची ताकद आहे. यावेळी समता सैनिक दलाचा युवक कधीही मूक प्रेक्षक नसतो तर तो संघर्षाचा शिलेदार असतो,
तुमच्या हातात मोबाईल आहे, पण तो फक्त रील्स पाहण्यासाठी नाही तर तो विचार पसरवण्यासाठीचं शस्त्र आहे,
तुमच्या मेंदूत शिक्षण आहे, ते नोकरीपुरतंच मर्यादित न ठेवता त्याचा वापर समाज बदलण्यासाठी करावा असे मत व्यक्त केले.आज वर्धापन दिनी आपण एकच संकल्प घेऊया,
संविधान वाचवण्याचा, बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचाआणि समतेचा झेंडा अखंड फडकवत ठेवण्याचा संकल्प सर्वांनी ग्रहण केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. सी. फुल्लूके जिल्हा प्रमुख, उद्घाटक विलास नागदेव, सी. डी. गौरे, धनपालजी गडपायले, सूर्यप्रकाशजी मेश्राम, राजहंस रामटेके, सेवक पिल्लेवान, मंगला सरजारे, वनिता मेश्राम, सुचिता गोस्वामी, संगीता गोंडाने, लालाजी बनकर, मुखरंजी मेश्राम, महादेवजी फुलझले आदि उपस्थित होते.
संचालन शरद धनविजय, प्रास्ताविक शालु रामटेके यांनी केले. कार्यक्रमासाठी ज्योती धनविजय शाखा प्रमुख, तन्नू माटे, श्रीदेवी बनकर, बबिता फुलझले, संगीता धनवीजय आणि समस्त समता सैनिक दलाच्या सैनिकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाची सांगता समापन वंदनेने करण्यात आली.















