
माजी आमदार ॲड. वामनराव चटप आणि सुभाष धोटे यांची उपस्थिती.
राजुरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – राजुरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी अरुणभाऊ धोटे यांनी नगर परिषद सभागृह, राजुरा येथे अधिकृतपणे पदभार स्वीकारला. उत्साह, जल्लोष आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेला हा पदग्रहण सोहळा राजुरा शहरासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. या गौरवपूर्ण प्रसंगी नगरविकास आघाडीचे शिल्पकार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, तसेच नगरविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याचे औचित्य अधिकच वाढले. या सोहळ्यापुर्वी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाषभाऊ धोटे आणि निवडक कार्यकर्त्यांसह राजुराचे आराध्य दैवत भवानी माता मंदिर येथे मातेचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.
पदग्रहण सोहळाला मुख्याधिकारी विवेक चौधरी , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अँड. दिपक चटप, तालुकाध्यक्ष कपिल इददे, राजेंद्र डोहे, नगरसेवक स्वप्नील गजानन मोहुर्ले, सिद्धार्थ आस्तिक पथाडे, मंगला पुरुषोत्तम मोकळे, पौर्णिमा गणपत सोयाम, ईश्वर सुधाकर ठाकरे, नीता किशोर बानकर, फरीना शाकीर सय्यद, इंदुबाई विठ्ठल निकोडे, रमेश काशिनाथ नळे, पुनम सारंग गिरसावळे, वज्रमाला अजय बतकमवार, दिलीप मुर्लीधर डेकर, संध्या चंद्रशेखर चांदेकर, अनंतकुमार गजानन ताजने, अन्नु हरजितसिंग संधू, गीता सिद्धार्थ पथाडे, शेख मोहम्मद जुबेर मो. इस्माईल, एजाज अहमद, किशोर हिंगणे यासह नगरविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राजुरा शहरातील मायबाप नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नूतन नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्यांच्या अपेक्षा, शहरविकासाची नवी दिशा आणि लोकाभिमुख कारभाराची आशा व्यक्त करत उपस्थितांनी आनंदोत्सव साजरा केला. नवीन नेतृत्वाखाली राजुरा शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पदग्रहण सोहळ्याने राजुरा नगरपरिषदेच्या कार्यकाळाला नवी ऊर्जा आणि सकारात्मक प्रारंभ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.















