prabodhini news logo
Home ठळक बातम्या मिरा-भाईंदरमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक; हसमुख गहलोत गटनेतेपदी विराजमान

मिरा-भाईंदरमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक; हसमुख गहलोत गटनेतेपदी विराजमान

0
99

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या राजकारणात भाजपने मोठा आणि निर्णायक डाव खेळत माजी उपमहापौर हसमुख गहलोत यांची भारतीय जनता पार्टीच्या महापालिका गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील भाजपचे नेतृत्व अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ७८ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत सिद्ध केले. निवडणूक निकालानंतर महापौरपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. मात्र महापौरपद महिलांसाठी आरक्षित होण्याची शक्यता लक्षात घेता, भाजपने अनुभवी आणि संघटनात्मक ताकद असलेल्या हसमुख गहलोत यांच्यावर विश्वास टाकत गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली.
हसमुख गहलोत हे भाजपचे जुने, निष्ठावंत आणि संघटनात्मक दृष्ट्या सक्षम नेते म्हणून ओळखले जातात. शांत पण ठाम भूमिका, कार्यकर्त्यांवर पकड आणि प्रशासनाशी समन्वय साधण्याची क्षमता ही त्यांची प्रमुख ओळख आहे. शहरातील भाजप संघटनेला बळकट करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
स्थानिक राजकारणासोबतच हसमुख गहलोत यांनी प्रभावी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या मतदारसंघातील १४६ विधानसभा क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव केवळ महापालिकेपुरता मर्यादित नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महापालिकेतील भाजप गटनेतेपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडणे, विकासकामांना गती देणे तसेच प्रशासनाशी योग्य समन्वय राखणे ही मोठी जबाबदारी हसमुख गहलोत यांच्यावर असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here