
भद्रावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भद्रावती तालुका स्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा चंदनखेडा येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मुधोली बिट अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आष्टा शाळेने माध्यमिक मुले खो- खो तसेच प्राथमिक मुले खो-खो मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच रिले रेस मध्ये प्राथमिक गटाने प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच माध्यमिक गटाने प्रथम सुद्धा रिले रेस मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. उंच उडी, लांब उडी यामध्ये सुद्धा प्राविन्य प्राप्त केले यांचे बक्षीस वितरण गट शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, स्वाती महाजन, नयन जांभुले सरपंच ग्राम पंचायत चंदनखेडा, सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते, यांचे सर्व श्रेय विध्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरीश कारमेंगे तसेच सर्व सदस्य शिक्षक किशोर चौधरी, कुळमेथे, प्रवीण ताजने केंद्रप्रमुख आष्टा , गजानन कहूरके मुख्याधापक, गीता हजारे, धारणे, घोडमारे आणि प्रशांत मरापे यांना जाते,,















