prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – खोटं प्रेम

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – खोटं प्रेम

0
78

प्रेम काळजी रोमँटिक अशांची
आवड नसते खोट्या प्रेमात l
एखादी व्यक्ती प्रेमळ आधार
एकनिष्ठ असल्याचे असते भासवत l

व्यक्तीच्या भावना हेतू
वागणूक जुळत नाही शब्दांशी l
एखाद्या व्यक्तीचा प्रेमाचा
संबंध असू शकतो स्वार्थांशी l

खोटं प्रेम लक्ष वेधण्यासाठी
पैशांसाठी आपल्या सोयीसाठी l
असे प्रेम काही दिवसाचे सोबती
प्रतिष्ठेसाठी किंवा नियंत्रणासाठी l

मैत्रीच्या नात्यात जेव्हा गोष्टी
चांगल्या चालल्या असतात l
लोक काळजीचे नाटक करतात
कठीण काळात गायब होतात l

सोशल मीडियावर खऱ्या
नात्याऐवजी प्रेम देखाव्यासाठी l
सार्वजनिकरित्या दाखवलेले
प्रेम कौतुक केवळ फायद्यासाठी l

असंगत वागणूक गोड कडू
गरजेचेवेळी संपर्क साधणे l
निराधार अप्रामाणिकपणा हेराफेरी
नात्यापेक्षा प्रतिमेला महत्व देणे l

करणी कथनीत फरक नको
बोलण्यात माधुर्य आदराचे असणे l
स्वार्थ न ठेवता प्रामाणिक संवाद
कठीण काळात मदतीला येणे l

प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here