prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विषेश कविता – आई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विषेश कविता – आई

0
111

आई माझी पुजनिय
होतीस तू मुर्तीमंत
तू आम्हाला सोडून गेलीस
भासे आम्हाला तुझी खंत…..१

तुझ्या प्रेमाला उपमा नाही
वाट तुझी मी पाही
लेक तुझी कवयित्री
चरणी तुझ्या फुले वाही….२

तुझ्या मायेची ऊब
जिवंत आहे अजूनही
आठवता तुझे शब्द
डोळ्यातून नयनाश्रू वाही…..३

दुःख सारे सहन करून
जगलीस तू आनंदाने
दिसे ना कधी चेहर्यावर दुःख
सदैव वाही आनंदाचे तराने…..४

मुखी घास लेकरांच्या भरविते
अन्नपूर्णा माझी माय
पदराखाली वाढवलेस आम्हा
जशी तू दुधावरची साय…..५

तुझ्या त्यागाला सिमा नाही
वाटते तुझा सार्थ अभिमान
सर्वांचा आदर, सत्कार
करत होतीस मान,सम्मान….६

सौ रंजना धर्मपाल आटे
जिल्हा वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here