
महानतेच रूप जीवनाच सुख तिच्यात असतं दडलं
प्रपंच्याचा गाडा हाकण्या सहज आयुष्य असतं पेललं
लेकराच्या गप्पा गुजगोष्टी फक्त तिलाच माहीत असते
आई फक्त आईतच असते..
लेकराच रडणं हसणं खेळणं सुख दुख तिलाच कळते
लेकराच्या सुख भल्यासाठी आयुष्यभर तिळ तिळ जळते
लेकराच दुखलं खुपलं तर अर्तमनात कसते
आई फक्त आईतच असते..
राग रुसवा फुगवा कसा घालवावा आईला कळतं
लेकराच्या भल्या आयुष्याच गणित तिलाच फक्त जुळतं
लेकराला घडविण्या रागाने लोभाने कधी मारतही असते
आई फक्त आईतच असते..
ती स्वताच्या मनाला मारून लेकरासाठी जगते
तिच्या वाट्याला कितीही दु:ख त्यातही विश्वासाने तगते
दु:खाला सुख मानून आयुष्यभर प्रपंचाचा भार सोसते
आई फक्त आईतच असते..
नव महीने ठेवून उदरी आपल्या रक्ताचा गोळा
स्वताच्या श्वासावर जगविते त्यास लावून लळा
स्वार्थ झाले जीवनाचे म्हणून मरण यातनेतही हसते
आई फक्त आईतच असते..
मायचीअपेक्षा ,इच्छा पुर्ती तिच्या झिजत्या तजत्या कायेत
अस्तित्वाची ओळख तिची वात्सल्य जिव्हाळा मायेत
तिच जगणं जीवनाचं सातत्य तिलाच माहीत असते
आई फक्त आईतच असते..
आजची कविता सर्व आईना समर्पित
नंदा भगत
कारंजा लाड, वाशिम
















