
माय तुझी माया म्हणजे,
सागराहून अथांग पाणी,
तुझ्या कष्टाच्या घामाची,
असते रक्तामध्ये गाणी….
नऊ महिने नऊ दिवस,
तू घेतलास जो श्वास,
माझ्या सुखासाठी आई,
तू सोसलास वनवास…
उन्हातान्हात राबून,
माझ्यासाठी सावली झालीस,
स्वतः उपाशी राहून,
घास माझ्या मुखी दिलास….
माझ्या एका रडण्याने,
व्याकुळ होई तुझे मन,
तुझ्या पदराच्या छायेला,
मुकले सारे त्रिभुवन…
बोट धरून चालवले,
दिलीस जगाची ओळख,
संकटाच्या वादळातही,
तूच असतेस पाठीराख….
देव शोधायला मंदिरात
जावे कशासाठी कोणी?
साक्षात परमेश्वर आहे,
तुझ्या ममतेच्या चरणी….
कितीही केले तरी आई,
तुझी पुण्याई मोठी आहे,
माझ्या यशाच्या शिखराखाली,
तुझीच माती आहे…
चंद्र-सूर्य आणि तारे,
फिके पडतील तुझ्यापुढे,
देवाचेही नतमस्तक,
होतील आई तुझ्यापुढे…
सोन्याचे पाळणे अन,
रेशमी हे सर्व विधी,
पण आई, तुझे उपकार अन्
ऋण फिटणार नाही कधी…
सौअनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना
















