prabodhini news logo
Home ठळक बातम्या कोंबडीची शिकार करुन अजगर पोलिस ठाण्यात, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कोंबडीची शिकार करुन अजगर पोलिस ठाण्यात, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

0
46

प्रज्ञा निमगडे
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली

गडचिरोली : आठ फूट लांबीचे एका अजगर कोंबडीची शिकार करुन पोलिस ठाण्यात पोहोचले. या अजगराने नंतर पोटातील कोंबडा तोंडातून बाहेर काढला, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिरोंचा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील दुर्गम भागातील पोतागुड्डम पोलिस ठाण्यात ७ जुलै रोजी सकाळी हा प्रकार घडला.

सिरोंचापासून सात किलोमीटरवर पोतागुड्डम गाव आहे. या गावातील पोलिस ठाण्याच्या आवारात ७ जुलैला सकाळी एका अजगराने प्रवेश केला. त्याचे पोट सुजलेले होते, त्यामुळे त्याला नीट सरपटता येत नव्हते, त्याच्यातील स्थूलपणा पाहून त्याने काही तरी गिळल्याचे दिसत होते. आठ फूट लांबीच्या या अजगराने काही वेळेत पोटातील कोंबडी हळूहळू पुढे सरकवत तोंडातून बाहेर काढली.
ही कोंबडी मृतावस्थेत होती. यावेळी पोलिस अंमलदार गौतम गवई यांनी अजगराला सुरक्षित जंगलात सोडले. पोतागुड्डम गावाजवळून इंद्रावती नदी वाहते, तेथे वन्यजीवांसह जलचर प्राणी नेहमीच आढळतात, पण अजगर थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. कोंबडीची शिकार करुन तिला परत शरीराबाहेर काढतानाचा अजगराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here