
राधेशाम खरात
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
मेहकर:- मेहकर बस आगारात ६ जुलैच्या दुपारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आशिष राहाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.२०१९ला मेहकरच्या नविन आगाराचे काम मंजूर झाले मात्र ते रेंगाळले आहे त्यामुळे पर्यायी बसस्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसामुळे प्रवाशांना उभे राहायला जागा नाही माता भगिनींना स्वच्छता गृहाची सुविधा नाही. त्यामुळे तात्काळ काम सुरु करावे. कामाला विलंब करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी आशिष राहाटेंनी निवेदनाद्वारे केली.१५ दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करु आसा इशारा द्यायलाही राहाहटे विसरले नाहीत दरम्यान यावेळी आशिष राहाटे यांनी विभाग नियंत्रकांना फोन करून परिस्थिती अवगत करुन दिली मात्र विभाग नियत्रकांनी दिलेल्या अजब उत्तरमुळे सारेच हैराण झाले.मी विभाग नियत्रकांना फोन करून मेहकर आगाराचे काम लवकर सुरू करण्याची मागणी केली तेव्हा कॉन्टॅक्ट खासदार साहेबांचाच आहे असे विभाग नियंत्रक म्हणाल्याचे आशिष राहाटे यांनी प्रबोधिनी न्युज नेटवर्क शी बोलताना सांगितले कॉन्टॅक्ट कुणाचा आहे याच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही विनाकारण कामाला विलंब करणाऱ्या व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्टॅक्टरवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे आशिष राहाटे यांनी सांगितले. सरकारने ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आशा योजना चालू केल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी होत आहे पर्यायी बसस्थानकावर चोया छेडखानीच्या घटना वाढल्या आहेत पाऊस असल्यास प्रवाशांना उभे राहणे देखील अडचणी ठरत आहे.
या बाबी आशिष राहाटे यांनी निवेदनाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिल्या आहेत १५ दिवसांच्या आत कामाला सुरुवात करावी अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी आशिष राहाटे यांनी दिली . यावेळी तालुका प्रमुख निंबाजी पांडव उपतालुका प्रमुख रमेश देशमुख
शहर प्रमुख किशोर गारोळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वप्नील गाभने युवासेना शहर प्रमुख आकाश घोडे ऋषी जगताप विभाग प्रमुख नारायण बळी साहेबराव हिवाळे मारोती जुनघरे संदीप गवई भागवत पाररकर विलास शिंदे अमोल बोरे शुभम पानखेडे अमोल मोरे हर्षद देशमुख ओम नरवाडे पवन आसाबे प्रितम देशमुख सुमित कुकडे सोनू जाधव भागवत बोरकर सागर जाधव सनी चव्हाण राहुल गिरी रितेश गायकवाड ऋतिक पानखडे महेश गायकवाड किरण जाधव गोविंद गायकवाड अस्लम शेख संदीप गारोळे वैभव निकम मंगेश नेमाडे विकि माने उपस्थित होते.














