डॉ. गुणवंत राठोड
जिल्हा प्रतिनिधी वाशीम
कारंजा- आज दि. 09/11/23 दारव्हा रोडवर कामटवाडा फाटा जवळ झालेल्या अपघातामध्ये दोन गंभीर जखमी झाले. दुचाकी चे समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. अपघाताची माहिती पोलीस कॉन्स्टेबल अंकुश सोनार यांनी तात्काळ संत गाडगेबाबा रुग्णवाहिका यांना दिली. संत गाडगेबाबा रुग्णवाहिका चालक विनोद खोड यांनी आपली रुग्णवाहिका घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालय ते दाखल केले. जखमी रुग्णाचे नावे महादेव 45 रा. दुघोरा.अरबाज पठाण वय 24 रा. पुसद. कारंजा उपजिल्हा रुग्णालय ये थील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण सर यांनी त्याला प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केले. त्यावेळी मदत साठी श्याम घोडेस्वार मेस्को सिक्युरिटी सागर खंडारे छोटू उयके राजूभाऊ राठोड कक्षा सेवक सचिन हनुमते व गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख त्यावेळी मदत केली.

