कोरपना प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
कोरपना तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय गडचांदुर येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनि माध्यमिक व उच्च माध्यमिक गैर आदिवासी गटातुन स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत तालुक्यातील 100 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डाॅ. प्राध्यापक अनिल चिताडे सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली होते. बक्षीस वितरक मा. रविंद्र शींदे ठाणेदार तर प्रमुख पाहुणे मा. सचिनकुमार मालवि गट शिक्षणाधिकारी कोरपना, मा. धनंजय गोरे सचिव, स्मिता चिताडे प्राचार्य, उज्ज्वला धोटे सहसचिव, राहुल बोढे सदस्य, रामचंद्र सोनपिपरे सदस्य, मुसळे केंद्र प्रमुख, देवाळकर केंद्र प्रमुख प्राख्याने उपस्थित होते कोरपना तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनि माध्यमिक व उच्च माध्यमिक चे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मा डॉ प्राध्यापक अनिल चिताडे साहेब यांच्या हस्ते आषिश नारायण हिवरकर यांना शील्ड, प्रमाण पत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच इतर क्रमांकाचे पारितोषिक वितरीत करण्यात आले आषीश यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापक स्वतंत्रकुमार शुक्ला, वडील नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,आई मंदा ना हिवरकर तसेच सर्व शिक्षक यांना दिले या कार्यक्रमाला शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यांनी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

