prabodhini news logo
Home अमरावती पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या माध्यमातून मेळघाट मधील अतिदुर्गम भागात मोफत महाआरोग्य...

पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या माध्यमातून मेळघाट मधील अतिदुर्गम भागात मोफत महाआरोग्य कॅम्प चे आयोजन

0
156

जीवन आधार,शालीन मेघे हॉस्पिटल,रोटरी क्लब, संकल्प माध्यमातून नियोजन

मेळघाट मधील आरोग्य सेवा कार्याला जपणाऱ्या पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचा जीवन आधार तर्फे सन्मान

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

अमरावती – जिल्ह्यातील (चांदुर बाजार) पोलीस’ म्हटलं की समाजाच्या संरक्षणासाठी दिवसरात्र राबणारी यंत्रणा, विना परवाना व्यावसायाला निर्बंध घालून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्पर असणारी यंत्रणा अशी सर्वसाधारण ओळख आहे. पण त्यापलीकडे ही आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून गोर गरीब अपंग अनाथ बेघर परिवार यांच्या सेवे करिता मेळघाट मधील अतिदुर्गम भागातील गरीब परिवार यांचे मोफत ऑपरेशन सेवा कशी होणार हा ध्यास मनामध्ये ठेवणारे अमरावती जिल्हा ग्रामीण विशाल आनंद (पोलीस अधीक्षक ) यांनी मेळघाट मध्ये अतिदुर्गम परिवार यांची मोफत ऑपरेशन सेवा कशी करता येईल या करिता जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजाळ यांच्याशी चर्चा करून अतिदुर्गम भागत मोफत ऑपरेशन कसे करता येईल या करिता विविध विषावर चर्चा करण्यात आली त्या माध्यमातून लवकर मेळघाट मधील प्रत्येक अतिदुर्गम भागामध्ये पोलीस अधीक्षक जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर,शालिनी मेघे हॉस्पिटल नागपूर व रोटरी क्लब साउथ ईस्ट नागपूर माध्यमातून मोफत आरोग्य सेवा व मोफत ऑपरेशन सेवा करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक विशाल आनंद, जीवन जवंजाळ यांच्या माध्यमातून करण्यात आला या मध्ये सर्व आजचे ऑपरेशन मोफत होणार असल्याची माहिती जीवन आधार संस्थेचे अमरावती जिल्हा अध्यक्ष रोशन दारोकर यांनी प्रसार माध्यमांना बोलताना दिली या वेळी उपस्थित जीवन जवंजाळ संस्थापअध्यक्ष जीवन आधार, डॉ. मीर गौस अली, राजीव वरभे अध्यक्ष रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूर, शालिनीताई मेघे हॉस्पिटल चे प्रशासकीय अधिकारी डॉ अश्विन रडके सर आदी सहकारी व अधिकारी उपस्थित होते मेळघाट मध्ये निःशुल्क महाआरोग्य शिबीर अयोजन संदर्भात बैठक संपन्न झाली मा sp अमरावती ग्रामीण विशाल आनंद सर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच या शिबिराचे आयोजन होणार असल्याची अधिकृत माहिती जीवन आधार सामाजिक संस्था अमरावती जिल्हा अध्यक्ष रोशन दारोकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here