
गिरणार चौकातील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात आदरांजली वाहीली
चंद्रपूर :-महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा मजबुत पाया रोवण्याचे मोठे कार्य स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तळागाळापर्यंत व सर्व सामान्य जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टी घेऊन जाण्याचे मोठे कार्य त्यांचे हातून झाले आहे. त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा देते त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहीण्यात आली.
दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात गिरणार चौक येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ब्रिजभुषण पाझारे, अंजली घोटेकर, राजेंद्र अडपेवार, सुरेश तालेवार, प्रकाश धारणे, भारती दुधाणी, राकेश बोमनवार, सचिन कोतपल्लीवार, रवी लोनकर, धम्मप्रकाश भस्मे, चॉंद सय्यद, जहीर खॉन कादरी, प्रलय सरकार, विनोद शेरकी इ. प्रामुख्याने उपस्थिती होती.














