
कुडेसावली येथील वं.राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज पुण्यतिथी महाेत्सव
वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
समाजातील प्रत्येक व्यक्ती हा जिवन जगत असतांना राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांचे विचार आत्मसात करून त्यापद्धतीने कुटुंबात,सार्वजनिक जीवनात जिवन जगत असतांना समाजातील आदर्श बनुन जिवन जगावे कारण राष्ट्रसंताच्या विचारातच एक यशस्वी जीवन पद्धती असल्याचे विचार माजी जी.प.सदस्य प्रमाेद चिमुरकर यांनी व्यक्त केले. ते कुडेसावली येथील राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी महाेत्सवाच्या गाेपालकाल्याप्रसंगी बाेलत हाेते.

कुडेसावली येथे वं.राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांचा ५५वा पुण्यतिथी महाेत्सव साेहळा दि. ११,१२,१३ डिसेंबरला पार पडला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने किर्तनकार म्हणून ह.भ.प. लिलाबाई म्हस्के या उपस्थित हाेत्या.तसेच तिन दिवसीय या कार्यक्रमात ग्रामसफाई,सामुदायिक ध्यान,रामधुन पालखी,घटस्थापना, रांगाेळी स्पर्धा,ग्रामगीता प्रवचन,भजन कार्यक्रम आदी कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटच्या समाराेपीय कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित प्राचार्य डॉ. डी.जी.म्हशाखेत्री, डॉ. बर्वे, अरूण झंजाळ, सचिन बदन आदी मान्यवर उपस्थित हाेते. यानंतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून राष्ट्रसंतांना माैन श्रद्धांजलि वाहली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माेरेश्वर दडमल,माेरेश्वर गुरनुले,प्रभाकर हुलके,सुकरू नन्नावरे,अमृत हुलके,आदींनी सहकार्य केले.














