prabodhini news logo
Home चंद्रपूर मालडोंगरी येथे रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

मालडोंगरी येथे रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

0
95

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

ब्रम्हपूरी तालुक्यातील मालडोंगरी येथील यारी दोस्ती गृप यांच्या वतीने भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.राजेश कांबळे यांच्या हस्ते पार पडले. तर उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके हे होते.
तर सहउद्घाटक म्हणून महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले ह्या होत्या. उपाध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिताताई पारधी, बांधकाम कंत्राटदार गणेश घोरमोडे हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते मोंटू पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, मालडोंगरीचे माजी सरपंच राजेश पारधी, उपसरपंच विनोद घोरमोडे, माजी नगरसेवक जगदीश आमले, ग्राम पंचायत सदस्य नितीन चौधरी यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मान्यवर म्हणाले की, महाराष्ट्र व मध्य प्रदेशात लोकप्रिय राहिलेल्‍या कबड्डी या खेळाला हुतूतू नावाने ओळखले जाते. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये या खेळाचे नाव चाडू-गुडू आहे. तर केरळमध्ये वंदिकली, बंगालमध्ये दो-दो आणि पंजाबमध्ये झबर गगने या नावाने कबड्डी खेळली जाते. आज जगभरात कबड्डीचा प्रसार करण्‍यात महाराष्‍ट्राची सिंहाचा वाटा राहिलेला आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here