बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी,उदगीर
उदगीर दि.२६ तालुक्यातील गणेशवाडी (डिग्रस) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते शुभम भूमणे यांची सोशल मीडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी जिल्हाप्रमूखपदी निवड केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे,महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे,महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,लातूर जिल्हा अध्यक्ष अफसर शेख,सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया जिल्हाप्रमूखपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
शुभम भूमणे यांच्या निवडीबद्दल पक्षातील मित्रपरिवार कार्यकर्ते यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या ते नक्कीच येणाऱ्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली कामगिरी करून आपला पक्ष वाढविण्यासाठी ते पक्षाने केलेल्या विकास कामाचा प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करतील असा विश्वासही यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

