कारची डिव्हाडरला धडक;चालकाचा जागीच मृत्यू

0
308

जालना येथील हृदयद्रावक अपघात

जालना प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज

जालना : जालन्यातील मंठा लोणार दिंडी महामार्गावरील तळणी फाट्यावर मंठ्याकडून लोणारकडे जाणाऱ्या कारने डिव्हायडरला धडक दिल्याने सोमवारी रात्री १२ वाजेदरम्यान अपघात झालाय. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झालाय. रोहन राजू सोसे (रा.लोणार जि.बुलढाणा) यांचा घटनास्थळी मृत्यू झालाय. तर रघुवीर रामा पवार आणि शुभम मनोहर शेटे (रा. लोणार. जि. बुलढाणा) हे दोघे जखमी झाले आहेत.

मंठा – लोणार या दिंडी महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार क्र. एमएच २० सीएस ९२६१ तळणी फाट्यावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील चालक रोहन राजू सोसे (रा. लोणार जि. बुलढाणा) यांच्या घटनास्थळी मृत्यू झाला. तर रघुवीर रामा पवार व शुभम मनोहर शेटे (रा. लोणार, जि. बुलढाणा) जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री १२ वाजेदरम्यान घडला.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच मंठा पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत,जमादार रखमाजी मुंडे, कॉन्स्टेबल मनोज काळे ब्रह्मानंद जायभाये, पांडुरंग हगवणे व मनोज काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांच्या संपर्क साधून जखमींना अधिक उपचारासाठी लोणारला हलवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here