
अमरावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिने ‘ मुख्यमंत्री माझी शाळा ‘सुंदर शाळा योजनेतर्गत श्री विवेकानंद कन्या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या आणि उज्वल भवितव्याच्या दृष्टिने’ आणि विद्यार्थ्यामध्ये दृढ आत्मविशवास ‘ सुस्पष्टपणा , देशाच्या विकासाचे प्रत्येक पैलूंवर चर्चासत्र कायद्यांची निर्मिती , सांसदीय कायदे मंत्रिमंडळाचे कार्य , परिषद , संसदेचे कार्य , बाल संसद सभेचे आयोजन हर्षेउत्साही ‘ वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया ते सत्ताधारी पक्ष ‘ संसद म्हणजे काय? ही प्रत्येक बाब विद्यार्थ्यांना शालेय जीवनांतच स्पष्ट आणि सहज कळाव्यात करिता ‘बालसंसद सभेचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले . प्रसंगी मुख्याध्यापक मंजुषा देशमुख ‘ शिक्षक योगेंद्र तट्टे , पी.बी. आडे. समीक्षा भोजने. नरेंद्र वाकोडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मंत्रिमंडळ स्थापन करुन शालेय व्यवस्थापनामध्ये विद्यार्थी उत्साही, आत्मविश्वासाने कारभार सांभाळतांना दिसत आहेत. यशस्वीतेकरिता शिक्षक शिक्षकेत्तर तथा विद्यार्थ्यानी परिश्रम घेतलेत.














