कविता- त्यागाची मूर्ती रमाई

0
84

अनाथ अबोध रमा गुणवंत,
न शिकता झाली,
कायदेपंडित बाबासाहेबांची,
सहचरी भाग्यवंत…१

घेतला संसाराचा भार,
एकलीच्या खांद्यावर,
तक्रार न करता तिने,
प्रेम केले कुटूंबावर..२

पती शिकतो परदेशी,
कधी नाही आली आड,
जपला पतीचा ध्यास,
पतीची आवड जपे जिवापाड…३

अपत्यांचे दु:ख विसरून,
गेली दुबळ्या समाजात रमुन,
झिजली चंदनापरी,
त्यांना आपले मानून..४

सावली बाबासाहेबांची झाली,
त्यागातच आनंद मानत जगली
माता खरी समाजाची ठरली,
म्हणून रमाची रमाई झाली…५

महाराष्ट्राच्या इतिहासात ,
सुवर्णाचे गौरवले एक पान,
त्यावर पतीबरोबर लिहिले रमाईचे नाव,
हाच त्यागमूर्ती रमाईचा मान….६

कवयित्री-अनुराधा जोशी.
अंधेरी, मुंबई ६९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here