दिन दुबळ्याची आई
झाली माझी रमाई
सोसून सारे दुःख
झाली जगताची आई।।
ना मागितले कधी
तिने कोणतेही सोनं
माझं कुंकवाच धनी
हेच माझं दागिनं।।
विद्वान तिचा पती
कधी गर्व नाही केला
शेणाच्या गोवऱ्या थापून
तिने संसार फुलविला।।
साथ देऊन भीमाला
पत्नी धर्म तिने पाळीला
भिमाच्याच साठी तिने
जीवन हो जाळीला।।
साधी भोळी रमाई माझी
होती रूपाची ती खाणं
नशिबान मिळालं तिला
भिमा सारखं हो सोनं।
अशी ती रमाई झाली
अवघ्या विश्वाची आई
जगत थोर माता होऊन
जगी गाजली रमाई।।
कवयित्री – समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

