
बापाचे प्रेम आतुर असते!
दाखवताना कठोर असते
त्यांच्या मनातले भाव काव्य फु्ले
आंबेडकरांचे विचार असते
आई शिवाय घर अपूर्ण दिसते !!
बाबाशिवाय आयुष्य आपूरे वाटते
आई वडीलाशिवय मला मी अधुरी दिसते
ज्यांना आई वडील नसतात !
त्यांना आई वडिलांचं प्रेम कधी मिळत नाही
म्हणून ते वाईटाकडे वळत नाही
ज्यांना आई वड़िलांच प्रम मिळत !!
ते कधीच आई वडिलांसाठी झुरत नाही
हात धरून चालायला शिकवणारा बाप असतो !
रात्र दिवस काबाड कष्ट करून
मुलांना शिकवणारा बाप असतो
अरे आपण देवाची पूजा करु स्तर !!
आपल्या या काबाड कष्ट करणाऱ्या बापाची पूजा करा
कारण असा देव आपल्याला पुन्हा या जगात कधी दिसणार नसतो
कवीयत्री – पूजा गौतम वाहुले
जालना












