prabodhini news logo
Home नागपूर लेख – संविधान

लेख – संविधान

0
181

आपला भारत देश हा खूप सुखी समृद्ध देश म्हणून आधीपासूनच ओळखला जायचा या देशात खूप सारे राजे महाराजे होऊन गेले मुख्य म्हणजे सम्राट अशोक यांचे राज्य खूप बलाढ्य असे त्यांनी बनविलेले होते म्हणजे अशोक राजा किती पटीने बलशाली बुद्धिवान शक्तिवान ज्ञानशील व्यक्तिमत्त्वाचे असतील त्यांनी खूप सार्‍या लढाया लढल्या जिंकले .अनेक राज्य मिळविले. पण युद्धामध्ये होणाऱ्या रक्तपाताने त्यांच्या मनाला एक गहन विचार करायला किंवा त्यांना मनावर खूपच आघात झाला असेल ते शांतीच्या शोधातून त्यांना बुद्ध मिळाले त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला व ते शांतीच्या मार्गावर आरुढ झाले त्यांनी ८४००० स्तूप बनविले म्हणजेच बौद्ध धर्माचा पाया त्यांच्यावर असा रुजला की त्यांनी पूर्ण परिसरच बुद्धमय बनवले सम्राट अशोकाने आपल्या मुलांना बाहेरील देशात पाठवून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला म्हणजे खूप सारे देश बौद्धमय झाले. कालांतराने भारतातून बौद्ध धर्म खूपच विरळ झाला. एक महान विद्वान विचारवंत महामानवाने तो लुप्त झालेला बौद्ध धर्म आणखी भारतात परत आणला डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांनी प्रत्येक धर्माचा गाढ अभ्यास केला व त्यांनी शालेय शिक्षणाच्या वेळीच महात्मा गौतम बुद्धांचे अध्ययन केले तसेच त्यांनी कुराण, बायबल गीता या सर्व धर्मग्रंथाचे सुद्धा अध्ययन केले बुद्ध धर्म त्यांना विज्ञानवादी वाटला शांतता प्रिय यांचा त्यांनी सखोल अध्ययन केले भारताला सोने की चिडिया म्हणायचे म्हणजे इथे सोने-चांदी किलोच्या भावाने विकल्या जायचे हे सर्व पाहून ब्रिटिशांनी हळूहळू भारतावर आपले राज्य स्थापन केले त्यांनी पूर्ण भारतालाच आपले गुलाम बनविले त्यावेळी खूप सारे क्रांतिकारी त्यांना आपल्या प्राणाच्या आहुती द्यावे लागले खूप वर्षानंतर ब्रिटिशांनी भारताला भारताच्या स्वाधीन करून निघून गेले त्यानंतर मुस्लिम यांच्यासाठी पाकिस्तान देण्यात आले काही मुस्लिम पाकिस्तानमध्ये गेले भारतात कोणत्याच प्रकारची अराजकता माजू नये म्हणून काही नियम लोकांवर लागू करणे खूप गरजेचे होते त्यामुळे नियमावली बनवण्यासाठी महान नेत्यांची निवड करण्यात आली त्यात डॉक्टर राजेंद्र प्रसाद समितीचे अध्यक्ष तर डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते संविधान सभेमध्ये 296 सदस्य होते त्यात यांनी गोपाल स्वामी अय्यंगर डीपी खेतान कृष्णस्वामी अय्यर बीएल मित्तल के एम मुंशी सय्यद अहमद अब्दुल्ला असे विद्वान घटना समितीचे सदस्य होते राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरच का म्हणायचे म्हणजे त्यांनी दोन वर्ष 11 महिने 18 दिवस राज्यघटना लिहून भारतीयांना 26 नोव्हेंबर 1949 ला सुपूर्द केले.
संविधान हे हिंदी इंग्रजी मध्ये लिहिले असून नायट्रोजनच्या गॅस चेंबर मध्ये ठेवल्या गेलेले आहे हे इटालियन स्टाईल मध्ये काळ्या पेनच्या शाईने लिहिले असून संसद भवन च्या लायब्ररीमध्ये आहे.
संविधानाच्या अनुषंगाने सर्वकाही घडामोडी होत असतात ते देश चालविण्यासाठी असो किंवा ट्राफिक असो कार्यालय असो किंवा प्रत्येक ठिकाणी नियमाचे पालन केले जाते राज्यघटनेवरच पूर्ण देश अवलंबून आहे त्यात जाती धर्म लिंग भाषा सर्वांना समानतेचा अधिकार दिला गेला स्त्रियांना तर बाबासाहेबांची कृतज्ञताच मानावे लागेल कारण बाळंतपणासाठी सुट्ट्या मिळते आणि जिथे बारा तास काम करावे लागत होते तिथे आठ तास काम करावे लागते स्त्री आणि पुरुषांना समानतेचा हक्क मिळाला वडिलांच्या संपत्तीचा हिस्सा अशा काही तरतुदी संविधानात केल्या आहेत केरळमध्ये असं एक गाव आहे जिथे प्रत्येक व्यक्ती संविधानाचे वाचन करतो संविधान हे त्यांचे वाचनाचे दिन नित्याचे कार्य आहे मला असे म्हणायचे आहे की आईच मुलांची शिक्षक आहेत तर तिने रोज संविधान वाचनाचे एक नियम बनविले तर ठीक होईल ना? विद्वान बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या या महान लेखणीचे आपल्याला आयुष्यात खूपच उपयोग होईल मग आपण रोजचा एक धडा संविधानाचा घेण्याचे निर्णय प्रत्येक स्त्रीने घेतले पाहिजे कारण बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर खूप आहेत तर त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे कार्य केलेच पाहिजे हे आपल्याला विचारायचे आहे नाही का?

लेखिका रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here