
नाते बहिण भावाचे आहे
प्रेम भावनांनी भरलेले….
दंगा, मस्ती भरभरून जरि,
बंध रेशमाचे असतात जुळलेले….
जन्म घेतला दोघांनी
एकाच आईच्या उदरातून….
नाते जुळले रक्ताचे असे,
सुखदु:खात अश्रू वाहतात दोहोंच्या नयनांतून….
बहिण, भाऊ दोघेही
आहेत एकाच माळेचे मणी….
भांडणं तंटा झाला तरि ,
हुरहूर लागते भेटण्याची मनी….
रक्षाबंधन हा दिन आहे
अतिभाग्याचा दोहोंसाठी असा….
धागा बांधून रेशमाचा बहिण,
रक्षणाचा भावाकडून घेई वसा…
बहिणीच्या सुखदुःखात भाऊ
नित्य बहिणीचा पाठीराखा होई….
नडतो सर्वांनाच एकटा जर,
कुणी बहिणीच्या अंगाशी येई….
पुराणात द्रौपदीने बांधली
कृष्णाच्या जख्मी करंगळीला चिंधी…
रक्षणाचे दिले वचन कृष्णाने ,
वस्त्रहरणात वाचविण्याची मिळाली संधी….
रक्षाबंधनाची झाली अशी सुरूवात
पवित्र सण हा नारळी पौर्णिमेला येतो खास…..
वरूण देवतेची पूजा करिती कोळी बांधव ,
वाहती नारळ समुद्रास….
बहिण भावाच्या पवित्र नात्यास
करि उजागर रेशमी धागा….
घट्ट करि मग बंध अजूनी ,
मनात न ठेवता कुठलाही त्रागा…
कवियत्री आशा फुल्लुके, बोरिवली मुंबई…














