
बंध रेशमाचे रेशीम म्हटले कि खुप नाजूक असा एक मुलायम धागा असतो.आणि तो जर ओढला ताणला गेला तर तो लवकरच तुटतो.आणि जर तो धागा थोडाही जास्त सोडला तर तो गुंतून जातो.त्याच प्रमाणे असते बंधन रेशमाचे वर्षातून एक वेळा हे जाणीव करून देण्यासाठी हा रक्षाबंधन येत असतो.भाऊ बहिणीच खूप जवळचं असं नातं
एका रेशीम बंधाने त्याच स्वागत केल्या जाते.म्हणजे एक दुसऱ्यांसोबात कधीही असल्याची जाणीव होत असते.भाऊ बहिणीचा रक्षक म्हणून पाठीमागे सदैव उभा राहण्याची मंगल कामना बहिणीला देत असतो. व तो अस्तोही मग तो भाऊ लहान असो कीवा मोठा असो पण बहिणीच्या सोबतीचे प्रत्येक क्षणी असतोच असे नाही की राखी नाही बांधली तर बहीण भाऊ एकमेकांना पाठिंबा नाही राहतील असे कधीच नसते हे नातेच अशे आहेत की इथे स्वार्थीपणा नसतो बहिणीला काही त्रास असला तर भावाच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहतात. व भावाला काही झाले तर बहीण हताश होत असते आणि काही रक्ताचे नाते नसले तरी मानलेले बहीण भावाचे नातेसुद्धा खूप चांगले असतात.
रक्ताचे नाते नसले तरीही ती मनाचे बहीण भावाचे नाते असतात.मग त्यात जात, पात प्रांत ,भाषा, श्रीमंत गरीब या कशाचेच अडथले नसतात.ते नातेच असतात बंध रेशमाचे
तू असो सुखी प्रतिक्षणी
मिळो तुला छान जिवन संगिनी
अशा माझ्या सदैव शुभेच्छा तुला
राहो तू सुखी समाधानी जीवनी
कवियत्री रंजना भैसारे
नागपूर














