prabodhini news logo
Home कविता आजची कविता वाट बघते भावाची

आजची कविता वाट बघते भावाची

0
123

वाट बघते भावाची
त्याची बहीण लाडाची
भाऊ बहिणीच्या नात्याला
सर नाही त्याला कशाची

गरिबीच्या मुळे दादा
मला नको घेऊ साडी
भाजी भाकरीची आहे
अमृतासमान गोडी

दादा तुझे असणेच
आहे मला हे महान
तुझा हात फिरु देना
माझ्या डोक्यावरून

वाट बघतेय दादा
रक्षाबंधन सणाला
नयन अश्रुंनी भरले
दादा तुला भेटायला

नको मला धनपैसा
प्रेमाचे दोन शब्द बोल
माया बहिण भावाची
जगी आहे अनमोल.

कवियत्री शोभा वेले, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here