नाते भाऊ बहिणीचे
नाते आपुलकीचे
कितीही वाद झाले
तरी, नाते जिव्हाळ्याचे
नाते भाऊ बहिणीचे
बहिणीची माया
असते भावावर देते ती
नेहमीच प्रेमाची छाया
नाते भाऊ बहिणीचे
हे बंध रेशमाचे रे
कितीही ताणले तरी
कधीच न तुटणारे
बहिणीने बांधावी
राखी भावाला
उदंड आयुष्य मिळू दे
त्यास, हे ची मागणे देवाला
भावा बहिणीचा
हक्काचा सण
म्हणतात त्याला
रक्षा बंधन.
रेखा डायस
गोवा

