तुझ्या आठवणीच्या समुद्रात
किती बुडुन जावं
श्वास माझा रोखतांना
तुच जवळ असावं !!१!!
खुपदा तुझा भास होतो
सतत डोळ्यात दिसतेस तु
दुसऱ्या क्षणी स्वप्नात माझ्या
का बर नसतेस तु !!२!!
तुला जवळ घेऊन
खुप कांहीं सांगाव वाटत
किती महत्वाची आहेस तु
हेच पटवून द्याव वाटत !!३!!
खुप प्रेम आहे तुझ्यावर
कुण्या शब्दात सांगु तुला
बोल फक्त एकदा मला
माझं प्रेम कळु दे तुला !!४!!
तेंव्हा आपल्या सहवासात
किती होता सुखाचा ढिगारा
थोड्या एका चुकिमुळे
झाला दुःखाचा पसारा !!५!!
कवी गोविंद श्रीमंगल

