prabodhini news logo
Home कविता आजची कविता  – सहवास

आजची कविता  – सहवास

0
136

तुझ्या सहवासात
खुलते माझे मन
तुझ्या विना माझे
वाटे अधुरे जीवन ।।१।।

गुंतत गेला जीव
रमतो फुलापानात
सुख घेऊन आलेस तू
खरोखर माझ्या जीवनात।।२।।

तुझ्या सहवासात आता
जीवन माझे फुलले
नकळत दुःख सारेच
हळुवारपणे ढळले।।३।।

अंधाऱ्या रात्रीत खरच
तू प्रकाश होऊन आले
जीवनात माझ्या प्रेमाचे
शुभ्र चांदणे फुलवलेस।।४।।

मन आता माझे कधींही
राहत नाही उदास उदास
तुझा सहवास फुलापरी
लाभला आहे मला खास।।५।।

जीवन माझे फुलत रहावे
गुलाबाचा त्या फुलापरी
लक्ष्मीच्या पावलांनी मी
असे सुख यावे माझ्या घरी।।६।।

कवयित्री समिंदर निवृत्तीराव शिंदे,लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here