आजचा लेख – आयुष्याच्या वळणावर

0
139

 

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात बदल होतच असतात. त्या बदलाने आयुष्याला दुसरेच वळण लागते. एका घटने मुळे मनुष्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते.
मुलांची शिक्षणे झाली की नोकरीच्या शोधात केव्हा केव्हा त्यांना बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करावी लागते. बाहेरच्या देशात नोकरी करणे इतके सोपे नसते. त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. आयुष्याच्या वळणावर हे बदल घडून येतात आणि या बदलांचा ती व्यक्ती स्वीकार ही करते.
स्त्रीच्या आयुष्यात, प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात वळण हे येतच असते. मुलीचे लग्न झाल्यावर तिच्या आयुष्यात होणारा बदल हा तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो. तिला मुले झाली की तीचे आयुष्य बदलते म्हणजे स्त्रीचे आयुष्य हे वळणावळणावर बदलत असते. लहानपणी ती एक बापाची मुलगी असते, तरुणपणी ती कोणाची बायको होते नंतर ती तिच्या मुलांची आई होते. मुले मोठी झाली त्यांची लग्न झाली कि ती कुणाची सासू होते, मग तीला नातवंडे होतात ती आजी होते, पण घरातली जबाबदारी तिची संपत नाही, घरातला पुरुष वय झालं की रिटायर्ड होतो, आराम करतो. पण बाईला रिटायरमेंट नसते.
तिच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या वळणा वळणावर बदलतच असतात. त्या कमी होतच नाहीत .

लेखिका रेखा डायस
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here