वेड्या बहिणीची
ही वेडी माया
स्नेहाची ममतेची
सदा प्रेमाची छाया…
सण भाऊबीजेचा
आनंद उल्हासाचा
माहेरी जाण्याचा
दिन भाग्याचा…
मी भाऊ भाग्यवंत
लाभे मज बहीण
ना भासे उणीव
विसरे भूक तहान…
घेई समजून मला
ना उणे कशाला
एकुलत्या भावाला
पूर येतो प्रेमाला….
आवडती सुनंदाताई
माझी लाडकी बहिण
मायेच्या महासागरी
मी सर्वस्व वाहीन…
कवी – प्रा.नानाजी रामटेके
आरमोरी,जिल्हा गडचिरोली

