चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यात विजयासाठी विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची मोर्चेबांधणी
महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मैदानात
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मतदारसंघासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कंबर कसली आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला अनुकूल असलेले वातावरण बघता क्रांतीभूमी चिमूर येथे १६ नोव्हेंबर स्थळ सेंट क्लारेट शाळेजवळ राहुल गांधी तर अतिदुर्गम, आदिवासी बहुल अशा गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे येत्या १७ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची तोफ धडाडणार आहे.
काँग्रेस पक्षाने सर्व धर्मसमभाव विचारधारेने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच भूमिका घेतली. महाराष्ट्रात तर दोन पक्ष फोडून भाजपने सत्ता स्थापन केली. अशा या महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतीभूमी चिमूर येथे जातीय विषमता, व यातून निर्माण झालेली अराजकता दूर करण्यासाठी १६ नोव्हेंबर काँग्रेस नेते राहुल गांधी येणार आहेत. तर वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीं संस्कृती, आदिवासीं बांधवांच्या, महिला भगिनी, युवक, युवतींच्या समस्या जाणण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी येत्या १७ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील वडसा येथे भव्य सभा होणार आहे.
आयोजीत सभेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महत्वाचे नेते, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाचे नेते, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उमेदवार, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या जाहीर सभेस जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

