प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर शाखेचे आजीवन सदस्य, विकलांग सेवा समितीचे सचिव,अशासकीय सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती ग्रामीण चंद्रपूर तसेच यासारख्या विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असलेले युवा समाजसेवी व्यक्तिमत्व देवराव कोंडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कोंडेकर परिवाराचे वतीने देवाडा महाकाली नगरी येथील सुप्रसिद्ध डेबू सावली वृध्दाश्रमात वृद्धासमवेत सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम.जाधव , राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र रहाटे, सुभाष शेडमाके राज्य सचिव मनसे संघटना, नारायण चव्हाण जिल्हा प्रधान सचिव महाराष्ट्र अंनिस चंद्रपूर, ऊर्जानगर सेवाधिकारी शंकर दरेकर,राजकुमार गिमेकर अध्यक्ष ऊर्जा फाउंडेशन, ज्योती दरेकर, रजनी बोढेकर, सौ.योगिता कोंडेकर,युवा फाउंडेशनचे वंश निकोसे, राज सर आदींची उपस्थिती होती.
कोंडेकर हे श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या संस्काराने तयार झालेले व्यक्तिमत्व आहे. कर्मयोगी संत तुकाराम दादा गीताचार्य आणि आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचा पावन सहवास त्यांना लाभला,हा दैवयोग त्यांना लाभला. सेवाकार्यानेच मनुष्य अमर होत असतो हे संतबोध आहे त्यामुळे जनसामान्यांना आधार देणारी होईल ती सेवा सुरू ठेवावी.एकंदरीत ते करित असलेले सामाजिक सेवेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर दरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. दरेकर यांनी केले.

