prabodhini news logo
Home ठळक बातम्या “आई तुझ्या कुशीत” या विषयाला साहित्यिकांचा उत्तम प्रतिसाद

“आई तुझ्या कुशीत” या विषयाला साहित्यिकांचा उत्तम प्रतिसाद

0
105

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – नागपूर : दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र आयोजित ” आई तुझ्या कुशीत या उपक्रम विषयावर जवळपास ११३ साहित्यिकांनी सहभाग नोंदवून आपल्या कवितेतून आणि लेखाच्या माध्यमातून आईचे प्रेम , आपुलकी, जिव्हाळा ,माया,ममता या विषयावर दर्जेदार काव्याच्या तसेच लेखाच्या माध्यमातून अतिशय प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण रचना सादर केल्या. या विषयाला महाराष्ट्रातील सर्वात सहभाग नोंदविणारा साहित्य समूह म्हणून आज राज्यात साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र या समूहाने नावलौकिक मिळविला असून अव्वल स्थान मिळविले आहे.
सहभागी सर्व साहित्यिकांचे अभिनंदन समूह संस्थापिका कल्पना टेंभूर्णीकर ,समूह संस्थापक प्रा.नानाजी रामटेके ,समूह प्रशासिका वैशाली खंडारे ,समूह निरिक्षिका माला मेश्राम ,समूह मार्गदर्शक डॉ.हरिश्चंद्र धिवार यांनी केले असून त्यांच्या पुढील साहित्यीक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here