prabodhini news logo
Home ठळक बातम्या हे पक्षफोडीतून स्थापलेली जनतेचा विश्वासघात करणारी महायुती- मुकुल वासनिक

हे पक्षफोडीतून स्थापलेली जनतेचा विश्वासघात करणारी महायुती- मुकुल वासनिक

0
164

खोजेबाज आ.जोरगेवार, उमेदवारीसाठी दारोदार: – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर प्रचार सभेत महायुती व जोरगेवारांवर हल्लाबोल

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

भाजप ने अगोदर पक्ष, व घरे फोडली, सत्तेत येताच जनतेला दिलेली शेतकरी कर्जमाफी रोजगार निर्मिती, सर्वांगीण विकास हि सर्व आश्वासने विसरून व्यापारी हित जोपासण्यासाठी येथील जनतेला वाऱ्यावर सोडून देशातील व्यापाऱ्यांचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले. हे पक्ष फोडीतून स्थापन झालेली महायुती जनतेचा विश्वासघात करणारी असून या निष्ठुर व जनविरोधी सरकारला सत्तेतून खाली खेचा व महाविकास आघाडी व घटक पक्ष तथा काँग्रेसच्या एकनिष्ठ उमेदवार प्रवीण पडवेकर यांना विजयी करा असे आवाहन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव मुकुल वासनिक यांनी चंद्रपूर येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना केले.

आयोजीत सभेस काँग्रेस जेष्ठ विनायक बांगडे, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल,काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे चंद्रपूर जिल्हा शहराध्यक्ष मतीन कुरेशी, मुजीब पठान (नागपूर), महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनंदा धोबे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, तसेच महाविकास आघाडीचे तथा घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी सह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना काँग्रेस नेते मुकुल वासनिक म्हणाले की, देशात दर १२ मिनिटाला महिला अत्याचाराची घटना घडत आहे. हाताला काम नसल्याने सुशिक्षित बेरोजगार हताश होऊन बसले आहे.शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड हालावलेली आहे. असे असताना महायुती नेत्यांकडून खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडल्या जात आहे. यांच्या भूलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीच्या पाठीशी सदैव उभे रहा असे आपण त्यांनी यावेळी उपस्थित सभेत केलें

यावेळी सभेला संबोधित करताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदा जनावरांच्या खरेदी – विक्री प्रमाणे महाराष्ट्रात पक्ष फोडून आमदार खरेदी करण्याचा पराक्रम भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारने राज्यात एकही उद्योगांना आणला नाही तर येणारे उद्योग गुजरातला पाठविल्या गेले. यामुळे राज्यात प्रचंड बेरोजगारी फोपावली आहे. सरकारमधील राज्यकर्ते शासन तिजोरीवर डल्ला मारण्यात मग्न असताना समाज विकृत नराधमांनी महाराष्ट्रातील आया बहिणी व मुलींच्या अब्रूवर हात घातला. एकीकडे बहिणींना दीड हजार दिल्याचा देखावा व दुसरीकडे खाद्यतेल, विज बिल, व इतर जीवनाचे वस्तूंचे प्रचंड दरवाढ करून लुट सुरू आहे. तुमचे आमदार हे आमंत्रण नसतांना खोक्यांसाठी गुवहाटी गेले.आता आमदारकी मिळविण्यासाठी अनेक पक्षांच्या दारी उंबरठे झिजवले. अशा सत्ता तिथे दत्ता कोलांट उडी घेणाऱ्या जनमतचा अनादर करणाऱ्या आमदाराला त्याची जागा दाखवा. अशी टीकाही त्यांनी जोरगेवार यांच्यावर केली.तर महाविकास आघाडीच्या गरिबीची जाण असणारा,एकनिष्ठ व प्रामाणिक उमेदवार प्रवीण पडवेकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सभेचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटि अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमजान अली, प्रस्ताविक नंदू नागरकर यांनी केले यांनी केले. प्रचार सभेस बहुसंख्येने संख्येने नागरीक उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here