पक्षांची गाणी सृष्टीचे रूप,
प्रत्येक सुरात आनंद थोर,
सुमधुर प्रचिती आनंदाची,
ऐकू येते होताच भोर.
पक्षी हे पृथ्वीवरील सर्वात पुरातन प्रजातींपैकी एक आहेत. ते पंख, पिसे आणि उडण्याची क्षमता असलेल्या खास वैशिष्ट्यांनी सजलेले आहेत.विविधतेत विविध पक्ष्यांच्या सुमारे १०,००० हून अधिक प्रजाती आहेत. हे विविध पक्षी पृथ्वीच्या प्रत्येक भागात आढळतात. जंगल, डोंगर, समुद्र, वाळवंट आणि अगदी शहरांमध्येही.
पंखाच्या रंगांचा नयनरम्य आविष्कार म्हणजे प्रत्येक पक्ष्याचे रंग, आकार, आणि रचना वेगळी असते. मोराच्या पिसांची निळसर हरित छटा असते, तर पोपट हिरवा, गडद रंगांचा असतो. पक्ष्यांच्या रंगांनी निसर्गाची शोभा वाढवलेली आहे.
उडण्याची क्षमता बहुतेक पक्ष्यांना उडण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यांच्या पंखांमुळे त्यांना उंच आकाशात झेप घेता येते. पेंग्विन आणि शुतुरमुर्ग यांसारखे काही पक्षी मात्र उडू शकत नाहीत, परंतु त्यांच्याही जीवनात खास वैशिष्ट्ये आहेत. प्रवासी पक्षी काही पक्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून प्रवास करतात. भारतात दर वर्षी लाखो प्रवासी पक्षी उत्तर-आर्क्टिक भागातून हिवाळ्यात येतात. हे पक्षी हिवाळ्यातील थंडीपासून दूर राहण्यासाठी भारतासारख्या उबदार प्रदेशात स्थलांतर करतात.
रंगबिरंगी पंखात थेंबांचा खेळ
पाऊस आला तर हसती,
थेंबा सोबत झोके घेती ,
भिजवून घेती डोळे मिटती.
आहाराच्या विविधतेत विविध पक्ष्यांची आहारपद्धती वेगवेगळी असते. काही पक्षी फळे, दाणे आणि कीटक खातात, तर गरूडासारखे शिकारी पक्षी मांसभक्षक असतात.घरे बांधण्याची कला पक्ष्यांचे घरटे हे त्यांच्या सुरक्षिततेसाठी असते. प्रत्येक पक्ष्याचा घरटे बांधण्याचा एक वेगळा प्रकार असतो. टिटवी पक्षी झाडांच्या फांद्यांवर छोट्या टोप्या बांधतात, तर चिऊ पक्षी छोटी घरटे बांधतात. कोंबडी पक्षी माणूस पाळतो व तिच्यासाठी निवारा करतो.प्रजनन आणि संवर्धन म्हणजे पक्षी मादी अंडी घालतात आणि त्यातून पिल्ले जन्माला येतात. काही पक्ष्यांच्या अंड्यांची रचना आणि रंग विविध असतो. पक्षी आपल्या पिल्लांना संरक्षण देतात, त्यांना शिकवतात.
पक्ष्यांचे आवाज पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने निसर्गातील शांती वाढते. कोकिळाचा गोड आवाज, बुलबुलाचा सुमधुर सूर, किलबिलाट करणाऱ्या चिमण्या हे निसर्गातील अनमोल संगीत आहे.
किलबिल शब्दांचा गुंजारव,
आकाशाला ओढ प्रीतीची,
क्षणोक्षणाला नवी आस,
सूर्यकिरणांच्या हो भेटीची.
संवर्धनाची गरज का आहे तर काही पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वाढती शहरीकरण, जंगलतोड आणि पर्यावरणीय बदलामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. अनेक संघटना पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत.भारतातील प्रमुख पक्षी अभयारण्ये भारतात अनेक ठिकाणी पक्षी अभयारण्ये आहेत, जसे भरतपूर, चिल्का सरोवर, सुंदरवन, राणीचील हे खासकरून पक्ष्यांसाठी संरक्षण राखणारे ठिकाण आहे.
उषेच्या किरणात उडता,
प्रत्येक फेरी नवा आनंद,
गातात नवि गाणी गोड,
मोकळ्या नभात विसावे धुंद.
पक्ष्यांचे महत्त्व सांगायचे तर पक्ष्यांनी पर्यावरण संतुलित ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ते परागकण प्रक्रिया, कीटकनाशन आणि जैविक विविधता टिकवून ठेवण्यास मदत करतात.म्हणूनच पक्ष्यांचा सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो, ज्यामुळे पक्ष्यांबद्दलची जागरूकता निर्माण होते. या आठवड्यात विविध उपक्रम घेतले जातात, ज्यामुळे लोकांना पक्ष्यांचे जीवन आणि त्यांच्या संवर्धनाची आवश्यकता याबद्दल माहिती मिळते.समाजातील सहभाग शाळा, म्हणजेच महाविद्यालये, आणि पर्यावरण प्रेमी लोक या सप्ताहात सहभागी होतात. पक्ष्यांवर लहान-लहान निबंध, चित्रकला स्पर्धा, पक्षीनिरीक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
वाचकहो,पक्ष्यांसाठी कृती योजना आपण राबविल्या पाहिजे जसे पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण, पाणी स्रोतांची निर्मिती आणि त्यांची स्वच्छता ठेवणे, त्यांना अन्न आणि निवासाचे साधन पुरवणे आवश्यक आहे. हे सर्व पक्षांच्या यादीत कोंबडी ही देखील एक पक्षी आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवे. फक्त ती इतर पक्षांप्रमाणे उंच उडू शकत नाही. म्हणून आपण तिला सहजपणे पकडू शकतो. तिला देखील इतर पक्षांप्रमाणेच अन्न,पाणी,स्वच्छता,सुरक्षित निवारा याची गरज आहे.
तृणांच्या गुंफलेल्या त्या बंध
घरट्यात आपुल्या विसावे,
कुटुंबात उबदार आनंद,
सांज आले की परतावे.
नुकत्याच होऊन गेलेल्या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने आपण
या सुंदर जीवांना, त्यांच्या आश्चर्यकारक जगाला आणि त्यांच्या संवर्धनाच्या आवश्यकतेला आदराने बघायला शिकलो . त्यांच्या गाण्यांनी सजलेल्या निसर्गातील हा भाग प्रत्येकाने सुरक्षित ठेवावा, हीच खरी कृतज्ञता आहे.
पाखरांना द्या तुमची साथ,
त्यांचे गरुड झेपे चे स्वप्न,
होऊ द्या साकार,
एकत्र येऊन द्या त्यांना,
संगतीचा हात.
कवयित्री सौ.पल्लवी संजय आल्हाट,
प्राणी पक्षी प्रेमी
अध्यक्ष प्रेरणा बहुउद्देशीय फाउंडेशन ता.श्रीरामपूर

