
आले आले सूर हे कुठुनी
विलसले हास्य चेहऱ्यावर
हा स्वरांचा मोहक काफिला
धूंदी चढली कशी मनावर
किती रंग ते आयुष्याचे
जसे सुंदर रंग फुलांचे
कधी सामना होता दगडाशी
तुकडे होतात ह्रदयाचे
क्षमा शांती राग लोभ
षढरीपू असतात अवतीभवती
अहंकार काम क्रोध बल
कळाया हवी रंगसंगती
हे आयुष्याचे गणित कळले तर
हास्य विलसते चेहऱ्यावर
जे जे येईल समोर ते ते
आनंदाने स्वीकारल्यानंतर
किती दिवसांचे जीवन अपुले
कुणा न ठावे काय पुढे
भविष्याची चिंता कशाला
आनंदाने जगणे आवडे
दुःखांतही हसून घेऊ
सुखाला ही वाटून घेऊ
जमेल तसे जमेल तेव्हा
मजे मजेने जगून घेऊ
कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा














