संविधान, अभिमान
स्वाभिमान, अधिकार
डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न
करू आपण साकार.
लोकशाही, समानता
न्याय, स्वातंत्र्याचा मंत्र
एकात्मता अंगीकारू
विकासाचे हेच तंत्र
हक्क आणि कर्तव्याचे
भान राखुया सारे,
देश सन्मान हृदयात,
भेदभाव विसरा रे.
शांतता बंधुता मनी,
शोषणाविरुद्ध लढा,
शैक्षणिक अधिकार,
मिळून सोडवू तिढा.
अभिव्यक्ती उपासना
प्रत्येका समान संधी,
प्रगतीची वाटचाल,
पूर्णत्वा येईल कधी.
झळको न्यायाचा तिरंगा,
संस्कार संविधानाचा,
मतदानाचा तो हक्क
जो विजय लोकशाहीचा.
कवयित्री सौ.पल्लवी संजय आल्हाट
श्रीरामपूर

