करू जागर संविधानाचा
आपल्याच त्या हक्काचा
समजून घेऊ संविधान
होईल उद्धार मानवाचा।।
घरा घरात ठेवले पाहिजे
हा खजिना ज्ञानाचा
मिळेल जीवन सर्वाना
सुख आणि समाधानाचा।।
समजून घेऊ अधिकार
जो संविधानात दिलेला
कोणता कायदा आहे
मानवाला महान केलेला।।
संविधान अशी एक
महान शक्ती आहे
तिथेच मानवाला
मिळणार मुक्ती आहे।।
संविधानात दिले आपले
हक्क आणि अधिकार
त्यामुळेच झाला आज
आपल्या मानवाचा उद्धार।।
संविधानाचा जागर आता
शाळा शाळांत करायचे
शिक्षणाचे सर्व अधिकार
गरीबांपर्येंत पोहोचवायचे।।
कोणीच करणार नाही
कोणत्या लोकांची गुलामी
असा ग्रंथ महान लिहिला
त्या बाबासाहेबांना सलामी।।
प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

