सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू; पोलिसांच्या मारहाणीमुळेच!

0
378

शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण उघड

परभणी : परभणी येथे आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा शव विच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये त्यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

आजची कविता – चंद्रावरची शाळा


संविधानाची विटंबना झाल्याने परभणी शहरात आंबेडकरी जनतेने निषेध आंदोलन केले. यामध्ये पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अनेक निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. यामध्ये सूर्यवंशी यांचा समावेश होता. त्यांचा रविवारी (दि.15) पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर परभणी शहरात दाखल झाले आहेत.

आजची कविता – चंद्रावरची शाळा


ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम ऑन कॅमेरा करावा अशी मागणी केली होती. तसेच सूर्यवंशी यांना आम्ही न्याय मिळवून देऊ. त्यांच्या न्यायासाठी लढा देणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here