गाढ झोपेतून गेली
चंद्रावरच्या शाळेत
सुंदर अशी होती तिथे
शाळा एकाच माळेत ।।१।।
नाही पुस्तक अभ्यास
तिथे होते खेळायचे
लपंडाव मस्त छान
फक्त खेळ पहायचे।।२।।
भीती नाहीच कुणाची
छान चंद्राला बोलायचे
चांदोबाच्या खुशीमध्ये
छान छान लोळायचे।।३।।
चांदोबांनी शाळा आज
छान छान भरवली
अशी शाळा चांदोबाची
नाही कुठेही पाहिली।। ४।।
सकाळची शाळा होती
स्वप्न सुंदर तुटली
मित्र सारेच राहिले
शाळा लगेच सुटली।।५।।
कवयित्री सौ.रंजना भैसारे
नागपूर

